ब्रेकींग : भगतसिंह कोश्यारी जाणार, रमेश बैस नवीन राज्यपाल !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून आता त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वक्तव्यांमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. त्यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवण्यात आला होता. राष्ट्रपतींकडून कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा कालावधी हा अनेक वादग्रस्त घटनांमुळे ओळखला जाणार आहे. यात पहाटे फडणवीस आणि अजित पवार यांचा करण्यात आलेला शपथविधी, १२ आमदारांच्या नियुक्तीला दिलेला नकार, विविध वक्तव्ये आदींचा समावेश आहे. आता त्यांची जागा रमेश बैस घेणार आहेत. त्यांनी आधी त्रिपुरा आणि झारखंड या राज्यांमध्ये राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

Protected Content