समता परिषदेच्या कार्यकर्त्याच्या घरी छगन भुजबळांची भेट

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी उपमुख्यमंत्री आमदार छगनराव भुजबळ यांनी येथील समता परिषदेचे कार्यकर्ते भीमराव महाजन यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी अमळनेर येथील समता परिषदेचे कार्यकर्ते भीमराव महाजन यांच्या घरी सदिच्छा भेट देत भीमराव महाजन यांच्या कुटुंबियांना सुखद धक्का दिला.

कुठल्याही संघटनेत, पक्षात काम करताना त्यात प्रत्येक कार्यकर्ता हा त्या पक्षाचा, त्या संघटनेचा नेत्याला आपल्या जवळचा व्यक्ती म्हणून नेहमी आदर्श मानतो. त्यातच त्यांनी त्याला खरोखर आपला कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर त्याला न्याय दिला तर तो अधिक जोमाने काम करतो. असाच काहीसा प्रत्यय अमळनेर येथील समता परिषदेचे कार्यकर्ते भीमराव महाजन यांच्या बाबतीत घडले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ हे धरणगांव येथे माजी आमदार कै.हरीभाऊ महाजन यांच्या मुलाच्या लग्नाला आले होते.तेथील विवाहभेट घेऊन परत जाताना त्यांनी अमळनेर येथील समता परिषदेचे प्रामाणिक कार्यकर्ते भीमराव महाजन यांना व त्यांच्या परिवाराला अचानक सदिच्छा भेट देत सुखद धक्का दिला.

याप्रसंगी भीमराव महाजन यांच्या कुटुंबीयांची भेट घेत चर्चा करीत त्यांनी आपल्या कार्यकर्ता भीमराव महाजन यांच्याकडे स्नेह भोजनही केले. यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन,धुळे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष राजेश बागुल, माजी उपनगराध्यक्ष अनिल गंगाराम महाजन,माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, भाजपाचे तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन, प्रा. प्रकाश महाजन, योगेश महाजन सर ,कैलास महाजन, समाजसेवक बापू पाटील, मनोहर महाजन, गुलाब महाजन,सेवा मंडळचे अध्यक्ष गणेश महाजन, रवींद्र महाजन, रमेश महाजन, संदीप महाजन, प्रा. नितीन चव्हाण, माळी महासंघाचे पारोळा तालुकाध्यक्ष वना महाजन, माळी महासंघांचे माजी युवक जिल्हाअध्यक्ष प्रा. हिरालाल पाटील,भूषण महाजन,प्रितेश सोनार, अतुल दिगंबर महाजन, देविदास चौधरी,अरुण चौधरी, प्रवीण महाजन, मंगेश महाजन, पवन महाजन, प्रशांत महाजन,टिन्नू भाऊ महाजन आदी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धरणगाव, एरंडोल, जळगाव याठिकाणी समता परिषदेचे कार्यकर्ते बहुसंख्येने आहेत. आज माजी मंत्री भुजबळ हे धरणगांव येथे विवाह प्रसंगी आले. या विवाहाला त्यांनी सदिच्छा भेट देत परतीचा प्रवास करताना अमळनेर शहरात अचानक सामान्य कार्यकर्ते यांना भेटूया असे म्हणत भीमराव महाजन यांच्या घरी अचानक आल्याने अमळनेर येथील समता परिषदेचे कार्यकर्ते, माळी समाज बांधव यांनाही हा सुखद अनुभव पाहायला मिळाला. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्ते यांच्याशी संवादही साधला. मात्र आपण सर्व सामान्य कुटुंबं आणि आपल्या दारी भुजबळ साहेब आले अशी भावना भीमराव महाजन यांच्या कुटुंबियानी व्यक्त केली.

Protected Content