जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगर परिसरात श्री साई नारायण बहुउद्देशीय संस्थातर्फे शहिद जवानांच्या स्मरणार्थ आज ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमात श्री साई नारायण बहुउद्देशीय संस्था नेहमी अग्रेसर असते. ४ जानेवारी रोजी शहरातील खोटे नगर परिसरात इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने शहीद जवानांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या कामगार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली कुळकर्णी, जिल्हाध्यक्ष भूषण भोळे, युवराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबीर यशस्वितेसाठी साई नारायण बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष अजय सोनवणे, उपाध्यक्ष अजय इंगळे, सचिव सागर खुंटे, सहसचिव हर्षल पाटील, सल्लागार जितेंद्र पेंढारकर, खाजिनदार हरीष हटकर, महेंद्र पाटील, योगेश बाविस्कर, संदीप चौधरी, भगवान महाजन, शालिक साळुंखे, सचिन सोनार, लक्ष्मण मांडोळे यांनी परिश्रम घेतले.