पुणे जिल्ह्याला संभाजी महाराजांचं नाव द्या – आंबेडकर

मुंबई- औरंगाबाद नव्हे, तर पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. 

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे.  आता या सगळ्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. औरंगाबाद नव्हे, तर पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. यावेळी त्यांनी दोन्ही जिल्ह्याला असलेल्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ दिला. ‘औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्यायला हवं. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघलांच्या काळात औरंगाबाद दुसरी राजधानी होती. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व कायम राहायला हवं,’ असं आंबेडकर म्हणाले.

औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा थेट असा फारसा संबंध नाही. उलट संभाजी महाराज आणि पुण्याचं नातं आहे. पुणे जिल्ह्यात संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांचं स्मरण राहावं, असं वाटत असेल तर योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचं  नाव दिलं तर अधिक संयुक्तिक होईल,’ असं त्यांना सांगितलं.

 

 

 

Protected Content