शेतकऱ्यांशी चर्चेआधी शहा मोदींच्या भेटीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चेच्या अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर तसंच वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे केंद्रातील बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहचले आहेत.

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर जवळपास आठवड्याभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज शेतकरी प्रतिनिधीमंडळ आणि केंद्रीय मंत्री यांच्यात पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. शनिवारी या आंदोलनाचा नववा दिवस आहे.

 

केंद्र सरकारनं तीन्ही काळे कायदे मागे घेत किमान हमीभाव देण्यावर लिखित आश्वासन द्यावं. आजच्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही तर राजस्थानातूनही शेतकरी राष्ट्रीय महामार्ग ८ वरून दिल्लीकडे कूच करतील असे : रामपाल जाट, (अध्यक्ष, किसान महापंचायत ) यांनी सांगितले

 

आज दुपारी २.०० वाजता शेतकऱ्यांसोबत बैठक होणार आहे. शेतकरी सकारात्मक पद्धतीनं विचार करत आपलं आंदोलन मागे घेतील अशी मला आशा आहे असे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले

आज होणाऱ्या पाचव्या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतील, अशी आशा भारतीय किसान युनियन नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केलीय.

Protected Content