उद्या एकत्र येणार फडणवीस आणि चव्हाण

नांदेड – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे रविवारी प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. यामुळे उद्याला काय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

रविवारी माजी मंत्री स्व. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे. त्याकरिता फडणवीस नांदेड येथे मुक्कामी असतील. शनिवारी रात्रीच फडणवीस यांचे नांदेडमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर रविवारी कुटुंर येथील कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे असतील. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे देखील एकाच व्यासपीठावर कुंटूर येथे पहिल्यांदा एकत्र येत आहेत. नांदेड आणि एकंदरीतच मराठवाड्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण आणि भाजपचे फायर ब्रँड नेते देवेंद्र फडणवीस हे दोघे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर काय-काय आरोप-प्रत्यारोप होतील, याकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत.

 

Protected Content