डांभूर्णी येथून तरूण बेपत्ता !

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी येथील आयटीआयचे शिक्षण घेणारा १८ वर्षीय तरुण घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ रवींद्र कोळी (वय-१८) रा. डांभुर्णी ता. यावल हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. यावल येथील शासकीय आयटीआय येथे तो शिक्षण घेत आहे. शुक्रवार १ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता हातात मोबाईल घेऊन कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. सायंकाळपर्यंत सौरभ घरी न आल्याने त्याचे वडील रवींद्र हिरामण कोळी व नातेवाईकांनी  त्याचा परिसरात, नातेवाईकांकडे आणि मित्रांकडे तपास केला असता, तो कुठेही आढळून आला नाही. याबाबत रवींद्र कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बागुले करीत आहे.

Protected Content