बेरोजगारांना भत्ता देण्याचे काँग्रेसचे आश्‍वासन

congress logo

नवी दिल्ली । दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये जे पदवीधर बेरोजगारांना प्रतिमहिना ५,००० रुपये तर पदव्युत्तर बेरोजगारांना प्रतिमहिना ७,५०० रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे वचन दिले आहे.

काँग्रेसने आज दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये सत्तेत आल्यानंतर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. तसेच स्वस्तामध्ये जेवण उपलब्ध करण्यासाठी १०० इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय काँग्रेस लाडली योजना पुन्हा सुरू करणार आहे. विद्यार्थ्यांना नर्सरी ते पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे वचन दिले आहे. महिला सुरक्षा, शिक्षण, वीज आणि पाण्याचा पुरवठा, रोजगार आणि दलित आदिवासींच्या कल्याणासाठी २० मुद्दे मांडण्यात आले आहेत. यासोबत लक्षणीय बाब म्हणजे बेरोजगारांना भत्ता देण्यात येणार आहे. पदवीधारकांसाठी ५ हजार रुपये तर पदव्युत्तरांसाठी ७५०० रुपये बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

Protected Content