मिशेलने काँग्रेसच्या बड्या नेत्याचे नाव घेतल्याचा ईडीचा दावा

mishel

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने लाचखोरीचा हिशेब असलेल्या ‘डायरी’त नोंद केलेल्या संक्षिप्त नावांचा खुलासा केला आहे. मिशेलने काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे नाव सांगितले आहे, असा दावा ईडीने या आरोपपत्रात केला आहे.

 

व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात ईडीने गुरुवारी चौथे आरोपपत्र दाखल केले. मिशेलच्या माहितीनुसार, डायरीत नोंदवलेल्या ‘Fam’ या संक्षिप्त नावाचा अर्थ फॅमिली म्हणजेच कुटुंब असा आहे. तसेच डायरीत नोंद केलेल्या संक्षिप्त शब्दांचा संबंध हवाई दलाचे अधिकारी, नोकरशहा, संरक्षण मंत्रालयातील अधिकारी आणि तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेल्या लाचप्रकरणाशी आहे, असे ईडीने म्हटले आहे. मिशेलच्या माहितीनुसार, ‘AP’ हे एका नेत्याचे नाव आहे. तर ‘Fam’ म्हणजे एक कुटुंब आहे, असा ईडीचा दावा आहे.

Add Comment

Protected Content