अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या तरूणावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रायपूर येथे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी सकाळी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४७ हजार ७१८ रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रायपूर येथील संदीप सिताराम परदेशी (वय-३६ ) हा तरूण गावात अवैधरित्या गुटखा विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना सोमवारी २७ मार्च रोजी सकाळी मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पो.ना. विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, पोकॉ किरण पाटील, राकेश बच्छाव, राहूल रगडे विशाल कोळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख आणि अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सकाळी ११ वाजता रायपूर येथे छापा टाकून संदीप परदेशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४७ हजार ७१८ रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहे.

Protected Content