अमळनेर तालुक्यात पाण्यासाठी भटकंती ; ग्रामीण भागात पाण्यासाठी मोजावे लागताय पैसे

amalner water

 

अमळनेर (ईश्वर महाजन) गत वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. केवळ संपूर्ण तालुक्यात ही स्थिती निर्माण झालीय. पाणी येते त्या दिवशी ग्रामीण भागात तर लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. हे नेहमीचेच चित्र आहे. धक्कादायक म्हणजे ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.

 

अमळनेर तालुक्यात सतत तिन वर्षांपासून कमी पाऊस झाल्याने यावर्षी सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अमळनेर तालुक्यात दुष्काळी स्थिती भयावह आहे. अजून उन्हाळा सुरु व्ह्याचा आहे त्यापूर्वीच येथील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. मराठवाडयातील जवळपास पाच हजार गांवामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील एकूण ८१ मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प मराठवाड्यात आहेत. महाराष्ट्रातील आणि धरणे व प्रकल्प पाण्या अभावी पडलेली आहेत.

 

अमळनेर तालुक्यात 154 गावांपैकी 78 गावांमध्ये पाणीटंचाई मोठी समस्या निर्माण झाली आजही तालुक्यात गावांना टँकर सुरू असून 32 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करण्यात आले आहेत. तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न एवढा तीव्र बनला आहे की, पाण्यासाठी शाळेतील मुलं भटकंती करताना दिसतात. एप्रिल महिन्यामध्ये ही परिस्थिती आहे तर, पुढे मे आणि जून महिन्यामध्ये परिस्थिती किती गंभीर बनेल?, हे सांगणे नको. काही गावांमध्ये टॅंकरद्वारे विकत पाणी घेऊन पाण्याची तहान भागवली जात आहे.तर काही ठिकाणी पाण्यासाठी भांडणे होताना दिसताय. पाण्याचा प्रश्न केव्हा सुटेल अजूनही ग्रामीण भागातील लोकांना पडलेले कोडे आहे. काही गावांमध्ये राजकारणामुळे पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. आज नद्या व नाले कोरडे पडलेले आहेत. दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात चाराटंचाई त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र असताना राज्य शासनाने एकप्रकारे दुष्काळग्रस्त जनतेबद्दल दुर्लक्ष व्यक्त करून हतबलता दाखवून दिली आहे. जनावरांच्या चा-याचा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकरी जनावरे कवडीमोल भावाने विक्री करीत आहेत. अन्य जिल्ह्यांत कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र स्वरूपाचा आहे. रोजगाराचा मोठा प्रश्न या दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेला आहे. सध्या निवडणूक धामधूम सुरू आहे. लाखो रूपये निवडणुकीवर खर्च करतात खरे, पण आजही ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न जसाचातसा दिसतोय. त्यामुळे जनता त्रस्त आहे. उमेदवार निवडणुकीत प्रचारात मस्त आहे. पण सामान्य नागरीकांच्या समस्या सोडण्यासाठी कोणी वाली नाहीय, हे देखील तेवढेच खरे आहे.

Add Comment

Protected Content