भुसावळातील हुडको कॉलनीत घरफोडी; बाजारपेठ पोलीसात गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील हुडको कॉलनीतील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, बाळू देवराम चौधरी (वय-६१) रा. हुडको कॉलनी, गजानन महाराज मंदीराजवळ कुटुंबियांसोबत राहतात. कामाच्या निमित्ताने ते २ डिसेंबर रोजी नातेवाईंकांकडे बाहेरगावी घराला कुलुप लावून गेले होते. शुक्रवारी ४ डसेंबर रोजी दुपारी १२ वाजता गावाहून आल्यानंतर त्यांना घराचा कडी कोयंडा तोडल्याचे दिसून आले. घरात जावून पाहिले असता घरात चोरट्यांनी सामान अस्तव्यस्थ करून घरात ठेवलेले ८ हजार ५०० रूपयांची रोकड लंपास केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयराम खोडपे करीत आहे.

Protected Content