Home Cities अमळनेर अमळनेरात मध्यरात्री किराणा दुकान फोडले; रोकडसह २१ हजाराचा मुद्देमाल लंपास

अमळनेरात मध्यरात्री किराणा दुकान फोडले; रोकडसह २१ हजाराचा मुद्देमाल लंपास


अमळनेर प्रतिनिधी । शहरातील पाचकंदील भागातील किराणा दुकान फोडून रोकड आणि किरणा सामानाची चोरी केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघकीला आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलजा आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील पाचकंदील भागात किशोर नारायणदास हिंदूजा (वय-३४) रा. सिंधी कॉलनी यांचे किशोर टेंडिंग नावाचे किराणाचे दुकान आहे. ३ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोट्यांनी दुकानाचे शटर उचकावून दुकानातील ७०० रूपये रोकड आणि २० हजार ४०० रूपये किंमतीचा किराणा दुकानातील माल चोरून नेला. किशोर हिंदूजा यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल हटकर करीत आहे.


Protected Content

Play sound