भाजपच्या खर्चाने जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टॅंकरचा पुरवठा — आ . राजूमामा भोळे (व्हिडिओ)

जळगाव, संदीप होले ।  भाजपच्या खर्चाने जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टॅंकरचा पुरवठा गरजेप्रमाणे करण्यात येत  असल्याची माहिती आज आमदार राजूमामा भोळे यांनी दिली 

एकीकडे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असतांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी नाशिक, पुणे, जळगाव येथे ऑक्सिजन उपलब्ध करून दिला असल्याची माहिती भाजपा जिल्हा अध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी दिली. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन टंकच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व आ. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यासाठी दर आठवड्याला एक ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात एक ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून हे तिसरे  टँकर असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनची  कमतरता भासणार नाही अशी ग्वाही दिली. या ऑक्सिजनसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नसून तो मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याचे आ. भोळे यांनी स्पष्ट केले. या ऑक्सिजन टँकरसाठी भारतीय जनता पार्टीच्या फंडातून निधी दिला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत या  टँकरचा उपयोगात आणण्यात येणार असल्याचे आ. चंदुलाल पटेल यांनी सांगितले. याप्रसंगी  भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भाजपा गट नेते भगत बालानी,  अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे  आदी उपस्थित  होते .

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/800135117601940

Protected Content