पाचोरा तालुक्यात १० ग्रामपंचायती बिनविरोध ( व्ही डी ओ )

पाचोरा : प्रतिनिधी ! तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सदस्यांची निवड आज बिनविरोध जाहीर करण्यात आली उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती . विहित मुदतीची वेळ संपल्यानंतर तहसीलदार कार्यालयाने ही बिनविरोध निवड जाहीर केली

पाचोरा तालुक्यात ९६ ग्रामपंचायतीपैकी माघारीच्या दिवशी सारोळा बु”, सांगवी प्र. लो., शहापुरा, रामेश्वर तांडा, वरसाडे प्र. बो, चिंचपुरा, वेरुळी बु”, वेरुळी खु”, वडगांव मुलाने व दिघी या १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

वाणेगांव येथील बापुराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचे निधन झाल्याने येथील प्रभाग क्रमांक १ मधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. अंतुर्ली बु” प्र. पा. येथे सन – १९९५ मध्ये जन्म झालेल्या व ७ वी पास नसलेल्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरल्याची तक्रार अरुण पाटील यांनी तहसिलदार यांचेकडे दाखल केली आहे. सारोळा बु” येथे वार्ड क्रमांक १ मधुन अनुसुचित जमाती महिला राखीव पदासाठी उमेदवार न मिळाल्याने ही जागा रिक्त राहिली आहे.

तालुक्यातील वेरुळी खु” येथे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सातही जागा बिनविरोध झाल्याने गावकऱ्यांनी एकवटुन ग्रामपंचायतीचा ५० वर्षांचा इतिहास मोडीत काढला आहे. यात वार्ड क्रं. १ मधुन सिमा पाटील, शांताबाई पाटील, संजय भिल, वार्ड क्रं. २ मधून – छायाबाई पाटील, नंदलाल पाटील, वार्ड क्रं. ३ – ईश्र्वर पाटील, सुशिलाबाई पाटील हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी सेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील, गोपीचंद पाटील, जितेंद्र पाटील, भगवान पाटील, संदिप पाटील, अर्जुन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आत्माराम पाटील, पंढरी पाटील, नाना पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

वेरुळी बु” येथे वार्ड क्रं. १ मधुन हिलाल पाटील, सविता पाटील, मंगलबाई महाजन, वार्ड क्रं. २ मधुन मोर्या भिल, कल्पनाबाई जाधव, वार्ड क्रं. ३ – सतिष कुमावत, हौसाबाई अहिरराव, वरसाडे प्र. बो‌. ग्रामपंचायतीत वार्ड क्रं. १ – जगन्नाथ पाटील, साधना पाटील, संदिप पाटील वार्ड क्रं. २ – रत्नाबाई पाटील, प्रमिला पाटील, वार्ड क्रं. ३ – यशोदाबाई भिल, मायाबाई मोरे, सांगवी प्र. लो. येथे वार्ड क्रं. १ वंदनाबाई वाघ, संगिता पाटील, शोभाबाई तेली, वार्ड क्रं. २ सुमित्रा पाटील, कु. दिप्ती पाटील वार्ड क्रं. ३ – सुवर्णा पाटील, कमलबाई सुरवाडे, सारोळा बु” – वार्ड क्रं. १ – सुनिता अहिरे, वार्ड क्रं. २ – अनिरुद्ध हवाळे, जनाबाई गाडेकर, वार्ड क्रं. ३ – अविनाश देशमुख, वाल्मिक पाटील, चिंचपुरा येथे वार्ड क्रं. १ मधुन प्रदिप पवार, मंगलाबाई पाटील, ज्योती बेलदार, वार्ड क्रं. २ मधुन गणेश पवार, अक्काबाई तडवी, वैशाली पाटील, वार्ड क्रं. ३ – गायत्री देवरे, सचिन कोकाटे, शरद पाटील, दिघी वार्ड क्रं. १ मधुन शिवाजी महाले, तेजस्विनी महाले, सुरेखाबाई निकम, वार्ड क्रं. २ रंजनाबाई परदेशी, भारत मोरे, वार्ड क्रं. ३ शांताराम कोष्टी, कल्पना ठाकुर, शहापुरा मधुन सुनिल परदेशी, सुवर्णा परदेशी, शितल राजपुत, सुपडाबाई माळी, दारासिंग परदेशी, शोभाबाई परदेशी, योगेश राजपुत, वडगांव मुलाने वार्ड क्रं. १ वंदना वाघ, सागर देवरे, दिलीप सोनवणे, वार्ड क्रं. २ – सुशिलाबाई अहिरे, निता पाटील, समाधान पाटील, वार्ड क्रं. ३ – भुपेंद्र मौर्य, मंगलाबाई पवार, सुनंदाबाई पवार तर रामेश्वर तांडा या ग्रामपंचायती मधुन वार्ड क्रं. १ – सरलाबाई राठोड, सरस्वती जाधव, बध्धु राठोड, वार्ड क्रं. २ – संगिता राठोड, दत्तात्रय राठोड, वार्ड क्रं. ३ – सुरेश पवार, अनिता राठोड अशा दहा ग्रामपंचायतीतील उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/391505038815860

 

Protected Content