Home Cities जळगाव विद्यापीठात शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी व मागासवर्गी कर्मचारी संघटना कार्यालयाचे उद्घाटन

विद्यापीठात शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी व मागासवर्गी कर्मचारी संघटना कार्यालयाचे उद्घाटन

0
231


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कर्मचारी भवनात विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना तसेच मागासवर्गीय कर्मचारी संघटना या दोन संघटनांना कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून महाराष्ट्र दिनी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते या दोन्ही संघटनांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

कर्मचारी भवनातील दोन कक्ष विद्यापीठ प्रशासनाने या दोन संघटनांना दिले आहे. या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या समवेत प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक प्रा. योगेश पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी महेश पाटील, राजु सोनवणे, जयंत सोनवणे, भिमराव तायडे, दुर्योधन साळुंखे, वैशाली शर्मा, विठ्ठल पाटील, आर.एम. पाटील उपस्थित होते. तसेच मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी विकास बिऱ्हाडे, दीपक गावित, अरूण सपकाळे, सुभाष पवार, राजु सोनवणे, जयंत सोनवणे, निता शिंदे, रेखा धम्मरत्न , विठ्ठल धनगर, शंकर गुरले, राहुल नन्नवरे, कृष्णा चव्हाण, भारत उफाडे, भिमराव तायडे, स्नेहल कुंवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound