भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील महिला गंभीर जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील कुंभारवाडा चौकात रोड क्रॉस करत असताना भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार ३० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवार १ मे रोजी रात्री १२.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील संतोषी माता हॉल येथे राहणाऱ्या स्वाती प्रवीण भोळे वय-४५ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी दीड महिन्याच्या सुमारास स्वाती भोळे ह्या या त्यांच्या दुचाकी (एमएच 19 सीडी 2000) यावरून कुंभारवाडा चौकातून रोड क्रॉस करत असताना भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच २० डीएफ ०७२२) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत स्वाती भोळे या महिला गंभीर जखमी झाल्या, तसेच अपघात घडल्यानंतर कारचालक हा कार घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी १ मे रोजी रात्री १२.३० वाजता कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जाकीर मंसूरी हे करीत आहे.

Protected Content