निर्दयीपणे म्हशींची कोंबून वाहतूक करणार ट्रक पकडला; चालकावर गुन्हा दाखल !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील भोईनगर येथील रस्त्यावरून अवैधरित्या म्हशींची वाहतूक करताना बुधवारी १ मे रोजी पहाटे ४.३० वाजता शहर पोलीसांनी आयशर ट्रक पकडला आहे. याप्रकरणी सकाळी ११.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील भोईनगर परिसरातून ट्रक मधून १८ म्हशींची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राणिमित्र रोहित रमेश महाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी भुसावळ शहर पोलिसांना माहिती दिली. प्राणी मित्रांसह पोलीस पथकाने बुधवारी १ मे रोजी पहाटे ४.३० सुमारास भोई नगर येथे थांबले. त्यावेळी आयशर ट्रक क्रमांक (एमएच ४१ एयू ६४५५) या वाहनाची तपासणी केली. वाहनाची तपासणी केली असता वाहनातून बेकायदेशीररित्या दाटीवाटीने घट्ट बांधून १८ म्हशी आढळून आले. दरम्यान भुसावळ पोलिसांनी 18 म्हशींची सुटका करत आयशर ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी प्राणिमित्र रोहित महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक अफजल अफजल खान वय-२७ रा. खरगोन, मध्य प्रदेश यांच्या विरोधात सकाळी ११.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार हे करीत आहे.

Protected Content