पारोळा पोलीसांच्या सतर्कतेने १२ गायींचे वाचले प्राण !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील अंबिका दूध डेअरीसमोर शुक्रवारी पहाटे मालेगावकडे अवैधरित्या गायींची वाहतूक करणारे वाहन पोलीसांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. यात तब्बत १२ गायींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पारोळा शहरात जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप वाहन आज शुक्रवारी सकाळी पहाटे ३ वाजेचा सुमारास मालेगाव येथे कत्तीलीसाठी घेवुन जाणाऱ्या गाई पकडण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे. तत्पूर्वी, अवैधपणे गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती अमळनेर पोलिसांनी पारोळा पोलिस स्टेशनला दिली होती. यावरून पारोळा पोलिस स्टेशनचे कर्मचारी अभिजित पाटील यांनी गौरक्षक समाधान धनगर यांना कळवले असता अमळनेर रोड शनीमंदीराजवळ अवैधपणे गुरांची वाहतूक करणारी गाडी पकडण्यात आली. यावाहनामध्ये गायींना पिकअप वाहनातून कोंबून वाहतूक केली जात होते. पारोळा पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यामुळे बजरंग दल गौरक्षक समाधान धनगर यांच्या मदतीने पीकअपला पकडण्यात यश आले.

गाडीतील चालक फरार असून क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस पुढील तपास करत आहेत. पारोळा येथे कारवाई करत असताना ताब्यात घेतलेल्या गायींना अमळेनर येथील गौशाळेत रवाना करण्यात आले. यावेळी शाम पाटील, बजरंग दलचे जयवंत चौधरी व शेलैश पाटील तसेच अमळनेर येथील पोलिस कर्मचारी महाजन, पुनम हाटकर पोलीस प्रशासनाकडून उशिरापर्यंत पर्यंत कारवाई करण्याचे काम चालू होते.

Protected Content