सिंधी कॉलनीत बहिणी-भावाकडून एकास मारहाण ; दोघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनीतील बाबानगर येथील भाऊ आणि बहिणीने शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केल्याची घटना रात्री 9 च्या सुमारास घडली. या घटनेत एका तरुणाला लोखंडी पट्टी मारल्याने जखमी झाला असून आज एमआयडीसी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरविंद कुकरेजा हा फुले मार्केट येथे मजुरी काम करतो. कुकरेचा यांच्या शेजारी कमलेश भुदलदास चिमराणी हा राहतो. १२ ऑगस्ट रोजी रात्री अरविंद सिंधी कॉलनी येथे उभा असतांना, कमलेशसोबत दुचाकीवरुन अरविंद याची मामी जया प्रेम कटारिया जात होती. घराजवळ आल्यानंतर अरविंद याने कमलेशला माझ्या मामी सोबत तु का फिरत आहे, असे विचारले असता, त्याचा राग आल्याने कमलेश व कमलेशची बहिण या दोघांनी अरविंद यास शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अरविंद याचे मामा, वडील तसेच बहिणीलाही दाघांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. कमलेशने लोखंडी पट्टी हातावर मारल्याने त्यात अरविंद जखमी झाला. उपचारानंतर अरविंद याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन शुक्रवारी रात्री कमलेश भुदलदास चिमराणी व त्याची बहिण (नाव माहित नाही) दोन्ही रा. बाबानगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील सोनार हे करीत आहेत.

Protected Content