चरित्र संशयावरून विवाहितेचा छळ ; पतीसह ५ जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील चारित्र संशयावरुन विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगावातील पिंप्राळा येथील पती आणि सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरसोली येथील पूनम बारी यांचा  १४ मे २०१७ मध्ये  जळगाव शहरातील पिंप्राळा येथील राहूल हिरालाल बारी यांच्यासेाबत विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले. त्यानंतर सासू पूनमच्या कामात छोट्या मोठ्या चुका काढायची. तसेच पतीला पूनमबद्दल खोटे सांगायची. पती त्यावरुन पूनमला मारहाण करत असे. त्यानंतर पती चारित्र्यांवर संशय घेवून शारिरीक व मानसिक छळ करत होते. सासरचेही त्याला पाठबळ देत होते. छळ असह्य झाल्याने पूनम ह्या माहेरी शिरसोली येथे निघून आल्या. महिला दक्षता समितीकडे तक्रारीनंतरही समझोता न झाल्याने पूनम बारी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. 

तक्रारीवरुन १३ ऑगस्ट रोजी पती राहूल बारी, सासू मंगलाबाई हिरालाल बारी, जेठ महेंद्र बारी, नंदोई सुनील काशीनाथ बुंधे, नणंद ज्योती सुनील बुंधे सर्व रा. पिंप्राळा, जळगाव या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

Protected Content