जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात रविवारी दुपारी मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला. यामध्ये जामनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून घरावरची पत्रे उडाली, गावातील विजेचे खांब तुटून पडले असून वीस तारा सुद्धा तुटले आहे. शिवाय शेतामधील ठिबक संचचे मोठे नुकसान झाले आहे.

जामनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर चक्रीवादळ व मुसळधार पाऊस पडला यामध्ये तालुक्यातील वाकोद, वाकडी, शहापूर, तळेगाव, चिंचोली, निमखेडी, फत्तेपुर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या चक्रीवादळामुळे वाकडी गावांमध्ये दोन पशुधन गमावले आहे. त्यामध्ये एक म्हैस व एक बैल झाडाखाली दमून मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये बाजीराव बारकू जोशी म्हैस वाकडी यांच्या म्हशीचा झाडाखाली दाबून मृत्यू झाला आहे. तर चंद्रकांत बारकू जोशी वाकडी यांचा बैल झाडाखाली दबून मृत झाला आहे तर अनेक जनावर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Protected Content