कांचन नगरातील 13 वर्षीय मुलाने घेतला गळफास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आली. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आक्रोश केला होतो. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

यश रमेश राजपूत (वय-१२) रा. कांचन नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, रमेश सुकलाल राजपूत रा. कांचन नगर हे पत्नी, मुलगा यश आणि मुलगी सोनी यांच्यासह वास्तव्याला आहेत. रमेश राजपूत हे शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला निघून गेले तर त्यांची पत्नी देखील सकाळी स्वयंपाक करून घरकामासाठी बाहेर गेल्या. घरी मुलगा यश आणि मुलगी सोनी हे दोघेच घरी होते.  सकाळी १० वाजेच्या सुमारास यश राजपूत घराच्या वरच्या खोलीत जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार बहिण सोनीच्या लक्षात आल्याने उघडकीला आला.

नातेवाईकांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताचा नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. यावेळी मुलाचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content