थोरगव्हाण ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी ज्योती पाटील

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी ज्योती पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील थोरगव्हाण ग्रामपंचायतचे लोकनियूक्त सरपंच म्हणुन निवडुन आलेले उमेश सोनवणे  यांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत जळगाव यांनी जातीच्या दाखला वैद्यता वेळेत सादर केला नसल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदावर उपसरपंच ज्योति केवळ पाटील यांची प्रभारी सरपंचपदी निवड मासिक सभेत करण्यात आली. थोरगव्हाण ग्रामपंचायतची मासिक सभा उपसरपंच ज्योति पाटील याचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ग्रामपंचायतचे ग्रामसेविका सौ.कविता बावीस्कर यांनी सभेला सुरुवात करुन अजेंडा वरील विषय वाचन करुन सविस्तर माहीती दिली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्यं गोपाल चौधरी, हिरालाल चौधरी, अनिल भालेराव, पदमाबाई पाटील, मनोहर पाटील, सिध्दुबाई पाटील, यशोदाबाई भालेराव, मथुराबाई पाटील उपस्थित होते.

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.