धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने एक अनोळखी अंदाजे ३५ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १ मे रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव रेल्वे स्थानकाजवडील रेल्वे क्रमांक २७७ जवळील २४ ते २६ दरम्यान असलेल्या रेल्वेरुळाजवळ एका धावत्या रेल्वेखाली अनोळखी अंदाजे ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १ मे रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या संदर्भात लोको पायलट यांनी धरणगाव स्टेशन प्रबंधक योगेश तायडे यांना माहिती दिली. त्यानुसार तायडे यांनी धरणगाव पोलिसांना अपघात संदर्भात कळविले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनांसाठी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णाला दाखल करण्यात आला. याप्रकरणी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटेल असे कुठलेही कागदपत्र किंवा वस्तू मृतदेहाजवळ मिळाली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी मयताची ओळख पटवावी असे आवाहन धरणगाव पोलिसांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पीएसआय करीम सय्यद हे करीत आहे.

Protected Content