जळगावातील दाणाबाजारात हमालाचा अकस्मात मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्रीराम मार्केटच्या आवारात एका हमालाचा अकस्मात मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. मयत हे दाणाबाजार मार्केटमध्ये हमाली काम करत होते. शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंकुश वसंत शिंदे (वय-४५) रा. शाहुनगर, जळगाव हे शहरातील दाणाबाजार परिसरात हमालीचे काम करतात. दरम्यान, त्यांना दारूचे व्यसन होते त्यामुळे दिवसभर काम करून मिळालेल्या रकमेतून दारूपित होते. जवळच असलेल्या श्रीराम मार्केटच्या आवारात झोपत होते. आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अंकुश शिंदे हे मयतस्थितीत आढळून आले. मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ प्रदीप बडगुजर करीत आहेत.

Protected Content