श्यामनगरात मध्यरात्री जुगार अड्ड्यावर धाड; सात जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघनगर नजीक असलेल्या श्यामनगर येथे मध्यरात्री जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांवर कारवाई करत १ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, वाघनगर परिसराजवळ असलेल्या श्यामनगरात जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाल्याने रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुहास राऊत, पोहेकॉ अनिल फेगडे, रविंद्र पाटील, उमेश पवार यांनी कारवाई जुगाराचा डाव उधळला.

सात जणांवर गुन्हा
रामानंदनगर पोलीसांनी दिपक डिगंबर सोनवणे (वय-४१) रा. श्याम नगर, धमेंद्र रमेश इंगळे (वय-५०) रा. श्याम नगर, बन्सीलाल खंडू पाटील (वय-५५) रा. श्याम नगर, समाधान एकनाथ पाटील (वय-३५), रूपेश सुभाष खैरनार (वय-२०), भुषण अनिल ब्राम्हणेकर (वय-२७), हेमंत रघूनाथ बाविस्कर (वय-४२) सर्व रा. रा. जय हनुमान नगर या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

१ लाख १२ मुद्देमाल हस्तगत
जुगार खेळणाऱ्यांकडून २ हजार ४३० रूपयांची रोकड, जुगार खेळण्याचे साहित्य, ५० हजाराची दुचाकी, ४० हजाराची रिक्षा, २४ हजार रूपये किंमतीचे ६ मोबाईल असा एकुण १ लाख १२ हजार ८३० रूपयांचा मुद्देमाल रामानंद नगर पोलीसांनी हस्तगत केला. पो.ना. रूपेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content