Home क्राईम जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या


बीड (वृत्तसंस्था) जमिनीच्या वादातून ४० जणांच्या जमावाने एका कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

 

 

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांगवडगाव येथे पवार व निंबाळकर कुटुंबात जमिनीचा जुना वाद आहे. बुधवारी रात्री पवार कुटूंबातील काहीजण या वाद सुरू असलेल्या शेत जमिनीत नांगरणीसाठी बाहेरगावातून आले होते. ही बातमी कळताच निंबाळकर कुटुंबातील सदस्यांनी गावातील चाळीस हल्लेखोरांना घेऊन घटनास्थळी पोहचत वाद घातला. थोड्याच वेळात वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. निंबाळकर कुटुंबाने पवार कुटुंबावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार आणि संजय बाबू पवार यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी पवार कुटुंबीयांच्या दुचाकीही जाळून टाकल्या.


Protected Content

Play sound