एसटी वर्कशॉप येथून भंगाराची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नेरी नाक्याजवळील एस.टी. वर्कशॉपजवळून अल्यूमिनीअम व लोखंडी पत्रा चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २० सप्टेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, नेरी नाका जवळ महामंडळाचे एस.टीचे वर्कशॉप आहे. या ठिकाणी एस.टी. दुरूस्त करण्याचे काम केले जाता. त्यामुळे काही भंगार एसटी वर्कशॉपच्या भिंतीजवळ भंगार ठेवले जाते. मंगळवार २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शंकर विश्वनाथ साबने रा. गेंदालाल मली आणि एका अनोळखी व्यक्तीने ५ हजार रूपये किंमीतीचे अल्यूमिनीअम आणि लोखंडाचे पत्रे चोरून नेल्याचे उघडकीला आले. यासंदर्भात एस.टी. विभागाचे अधिकारी राकेश विक्रम देवरे (वय-४२) रा. जिल्हापेठ जळगाव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.

Protected Content