गोजोरा गावात दोन गटांमध्ये हाणामारी : परस्पर विरोधी गुन्हे दाखल

भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील गोजोरा या गावात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

तालुक्यातील गोजोरा येथे गुरूवारी रात्री जुन्या वादातून दोन गटात जबर हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटातील ५ जण जखमी झाले. तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरुन एका गटातील ११, तर दुसर्‍या गटातील ६ जणांवर दंगल, प्राणघातक हल्ला तसेच अन्य कलमांन्वये गुरूवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवून एका संशयितास अटक केली. या घटनेत एका संशयिताकडे पिस्तूल होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

गोजरा येथे रात्री दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून यात पाच जण जखमी झाले आहेत. पहिल्या गटातर्फे लक्ष्मण बाळू सपकाळे (वय ३७, गोजोरा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जगन धर्मा कोळी (वराडसीम), सेवक उत्तम कोळी, धीरज उत्तम कोळी (भुसावळ) व अन्य तीन अनोळखींविरूद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्यादीत लक्ष्मण सपकाळे यांना तू माझ्याशी का बोलत नाही? या कारणावरून वाद घातला. पाहून घेण्याची धमकी दिली. गुरुवारी रात्री फिर्यादीच्या घरात अनधिकृत प्रवेश करत हॉकी स्टीक, स्टील रॉडने मारहाण केली. एका संशयीताकडे पिस्टल असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. दुसर्‍या गटातर्फे धीरज उत्तम कोळी (वय २५, अयोध्या नगर, म्हाडा कॉलनी, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयीत लक्ष्मण बाळू सपकाळे (रा. गोजोरा) व अन्य आठ ते दहा अनोळखींवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी लक्ष्मण सपकाळे याला अटक केली. दरम्यान, या हाणामारीत सेवक कोळी, गौरव शिरूडे व धीरज कोळी हे जखमी झाले. तपास एपीआय अमोल पवार करत आहेत.

Protected Content