शिरसाड येथील विवाहिता बेपत्ता

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील शिरसाड येथील ३५ वर्षीय विवाहिता दवाखान्यात जाते, असे सांगून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

मायाबाई शरद साळुंखे वय-३५ रा. शिरसाळा ता. यावल जि. जळगाव असे हरविल्याची महिलेचे नाव आहेत.

यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद भागवत साळुंखे रा. शिरसाड ता. यावल हे आपल्या पत्नी मायाबाई शरद साळुंखे यांच्यासह वास्तव्याला आहे. २२ जून रोजी सकाळी ११ वाजता मी दवाखान्यात जाऊन येते असे सांगून विवाहिता घरा गेल्या, सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने तिचे पती यांनी माहेरी चहार्डी ता. चोपडा येथे देखील आली नसल्याचा माहिती मिळाली. त्यानुसार तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या कुठेही आढळून आले नाही. अखेरीस गुरुवार ३० जून रोजी शरद साळुंखे यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून महिला बेपत्ता झाल्याची नोंद यावल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

Protected Content