भाजप महिला मोर्चातर्फे हळदी कुंकूचा कार्यक्रम

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रतिष्ठा महिला मंडळ व भाजपा महिला मोर्चा तर्फे आयोजित नारक्ती वंदन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन भुसावळ येथील लोणारी हॉल मध्ये करण्यात आले होते. या वेळी तालुक्यातील सर्व सीआरपी महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्या आंगणवाडी सेविका, मदतनिस व आशा वर्कर यांचा पण सत्कार करुण उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकूवाचे वान देण्यात आले. नेहमी शासनाने दिलेली कामे अत्यंत प्रामाणिकपणे करणारे व शासनाच्या योजना घराघरात पोहचवणार्या या महिलांचे योगदान महत्वाचे आहे असे आमदार संजय सावकारे यांनी आपल्या भाषणात सांगून महिला करीत असलेल्या कामांचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या सर्व योजना त्यातच महिलांना करिता असलेल्या योजनांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. या कार्यक्रमात राहुल ठोसर यांनी उपस्थित महिलांना राज्य व केंद्रशासनाच्या वेगवेगगळ्या योजनांची माहिती दिली व महिलांना उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे,प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे,तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील,शहराध्यक्ष युवराज लोणारी,संजय पाटील,परिक्षीत बऱ्हाटे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रंजना पाटील,कठोरा च्या सरपंच रोहिणी पाटील,मीना लोणारी,सोनल महाजन,प्रितमा महाजन,दिपाली बऱ्हाटे,माजी सभापती प्रिती पाटील, मनीषा पाटील, वंदना उन्हाळे, अनिता सपकाळे, रेखा सोनवणे, रेखा बोंडे, सारिका चौहान, बेलव्हाय सरपंच खाचने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठा महिला मंडळ च्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी करीत इतक्या मोठ्या संख्येत महिला या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. सूत्रंसंचालन राजश्री देशमुख यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिता आंबेकर, सोनल महाजन, जयश्री चौधरी,वैशाली भगत, वैशाली सैत्वाल,पल्लवी वारके, रंजना परदेशी यांनी प्रयत्न केले.

 

Protected Content