व. ता. आबा पाटील यांच्या स्मृती दिनी महाआरोग्य शिबीर

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यात तळागाळापर्यंत शिक्षण पोहचवणारे दिवंगत व.ता. आबा पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

अमळनेरात ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून स्मृतीशेष व.ता. आबा पाटील यांनी शिक्षणसंस्था उघडली. मागील वर्षी त्यांचे देहावसान झाले. त्यांची स्मृती कायम जतन व्हावी म्हणून जयऋतूकमल हॉस्पिटल व आय. सी. यु नवी मुंबई संचलित मोरया मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल,अमळनेर येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.
या महाआरोग्य शिबिराचे उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात विविध आजारांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ह्दयरोगतज्ञ डॉ. श्रीकांत वसंतराव पाटील, डॉ. ज्योती श्रीकांत पाटील मधुमेहतज्ञ, डॉ.दिनेश सी. महाजन स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्रतज्ञ डॉ.दीपक विजय धनगर, फुफ्फुस विकार तज्ञ, डॉ.पंकज चौधरी शल्यचिकित्सक तज्ञ यांनी रुग्णांची मोफत तपासणी व उपचार कामी औषधी सुद्धा मोफत देऊन आरोग्याबाबत अमळनेर शहरात जनजागृती करण्यात आली.
आरोग्य शिबिरासाठी प्रत्यक्ष तपासणीकामी किशोर पाटील ऍपरिका लॅब , प्रवीण बावस्कर सन फार्मा ,संदीप भालेराव (लॅब),आकाश माळी, धनंजय भदाणे, नंदिनी राजपूत हे मोरया हॉस्पिटल सहकारी व त्यांच्या स्टाफ, जयरऋतूकमलहॉस्पिटल मुंबई स्टाफ,स्रियांच्या तपासणीसाठी डॉ. अश्विनी महाजन या उपस्थित होत्या.
या शिबिर यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालय दोधवद ता. अमळनेर ,माध्यमिक विद्यालय हिंगोणा ता.चोपडा ,माध्यमिक विद्यालय भोणे ता. धरणगाव तसेच ना झी. पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

या शिबिरासाठी विशेष परिश्रम स्व.व.ता.आबा फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतले. या शिबिराचा लाभ एकूण ६००हून अधिक लोकांनी घेतला त्यात हृदयरोग ,मधुमेह, स्रीरोग,फुफ्फुसविकार ,आतड्याचे रोग यांचे संदर्भात तपासण्या झाल्या. भविष्यातही अशा स्वरूपाचे भव्यदिव्य महाशिबिरे आयोजित करण्याचा या संस्थेचा मानस आहे.

Protected Content