मुक्ताईनगर तालुक्यात ३.५० कोटी मंजूर निधीच्या विकास कामांचं भूमिपूजन

मुक्ताईनगर प्रतिनिधी | तालुक्यातील वढोदा, तालखेडा, पारंबी, मोरझीरा व दुई येथे ३.५० कोटी मंजूर निधीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला.

वढोदा ता.मुक्ताईनगर येथे ‘नाबार्ड योजने’अंतर्गत पूल बांधकाम करणे, ‘नावीन्यपूर्ण योजनें’तर्गत संरक्षण भिंत बांधकाम करणे, तालखेडा ता.मुक्ताईनगर येथे ‘२५१५ योजनें’तर्गत ‘तालखेडा ते जुने तालखेडा’ येथे रस्ता बांधणे, जुने तालखेडा गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे व कॉंक्रीटीकरण करणे, नवीन तालखेडा गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे व कॉंक्रीटीकरण करणे, ‘जि.प.जलसंधारण योजनें’तर्गत खोद तलाव बांधणे, पारंबी ता.मुक्ताईनगर येथे ‘३०५४ योजनें’तर्गत ‘पारंबी ते हिवरा’ रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, मोरझिरा ता.मुक्ताईनगर येथे ‘डोंगरी विकास योजनें’तर्गत अंगणवाडी बांधकाम करणे, सामाजिक सभागृह बांधकाम करणे, दुई ता.मुक्ताईनगर येथे ‘डोंगरी विकास योजनें’तर्गत अंगणवाडी बांधकाम करणे, गटार बांधकाम करणे, रस्ता कॉंक्रीटीकरण करणे आदी. सुमारे ३.५० कोटी रुपये मंजूर निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यासह आमदार चंद्रकांत पाटील व मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांच्या हस्ते तालखेड येथे महाराजस्व: अभियानांतर्गत हलखेडा व काही आदिवासी गावातील रहिवाशांना नवीन रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

या प्रसंगी भाजप जेष्ठ नेते ‘राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढाव’चे संयोजक डॉ.राजेंद्र फडके, पंचायत समिती सदस्या विद्या पाटील, वढोदा सरपंच सपना खिरोळकर, कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, डॉ.विष्णू रोटे, राजू शर्मा, बाळासाहेब पाटील, शिवसेना उप.तालुका प्रमुख नवनीत पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे, मुक्ताईनगर शहर प्रमुख गणेश टोंगे, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, नगरसेवक मुकेश वानखेडे, राजेंद्र हिवराळे, निलेश शिरसाट, दिनेश माळी, सैईद बागवान, हर्शल बडगुजर, देवा खेवलकर, गोलू बरडिया, आनंदा पाटील, निलेश माळी, चव्हाण आदी. बोदवडचे नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यासह

नरेंद्र पाटील, पद्माकर तायडे, प्रमोद कोळी, किशोर पाटील, शेषराव कांडेलकर, प्रमोद इंगळे, प्रमोद सोनार, अमोल कांडेलकर, सुर्यकांत पाटील, राजू मुंडे, संतोष जमाव, कमलाकर तायडे, लहू घुये, दीपक पवार, पवन कोन्गळे, विष्णू कोळी, विष्णू पाटील, जावेद खान, प्रदीप पाटोळे, जोहरसिंग राठोड, अनिल चव्हाण, देविदास बेलदार, निवृत्ती धाडे, संजय जवरे, शेख इस्माईल, ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी पवार, सुदाम चव्हाण, श्रावण धाडे, राहुल रोटे, पुंडलिक सरक, विनोद पाटील, उल्हास पाटील, अशोक गरळ, अशोक खवले, भास्कर सोनवणे, दिलीप भोलाणकर, अविनाश वाढे, पंकज धाबे, जयेश वाघ, राहुल खिरळकर, अक्षय गंगातीरे, रितेश मूळसकर, संजय मोरे, विक्की फाळके, विष्णू झाल्टे, प्रवीण कांडेलकर, अमोल पाटील, शैलेश पाटील, समाधान पाटील, रत्नाकर पाटील, शिवाजी पाटील, योगेश मुळक, राजू कांडेलकर, भारत पाटील, सोपान तलवारे, दिलीप पाटील, संतोष पाटील, संदीप दिवरे, शिवा पाटील, संदीप घाईट, महेश पाटील, नामदेव पाटील, काशिनाथ वानखेडे, गजानन वाघ, गजानन धाडे, दिनकर पाटील, गुलाबराव पाटील, रामधन पाटील, अरुण धांडे, गणेश माळी, दिगंबर बोदडे, रवींद्र पाटील, दीपक वाघ, सुरेश गायकवाड, प्रवीण गवई, संजय पाटील, दिलीप सांभारे, अनारसिंग पावरा, जंगलू पावरा, जगदीश पावरा, नंदलाल भोसले, राजू पिवळकर, प्रज्वल गावंडे, सोनू देशमुख आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Protected Content