राज ठाकरे खणखणीत नाणं : सुप्रिया सुळे

Supriya Sule Raj Thackeray

 

नाशिक (वृत्तसंस्था) त्यांच्यावर नेहमी आरोप होतो की मनसेकडे एकही आमदार नाही, खासदार नाही पण राज ठाकरे खणखणीत नाणे आहेत त्यामुळे ईडीची नोटीस आल्यापासून 72 तास टीव्हीवर फक्त राज ठाकरे दिसत होते. कृष्णकुंजवरून निघाल्यापासून ईडी कार्यालयात पोहचेपर्यंत त्यांचीच बातमी होती. घरातल्या सर्वसामान्य महिलेलाही उत्सुकता होती,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

 

नाशिकमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंचे केले आहे. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्याकडे सत्ता असो वा नसो मात्र प्रत्येक टीव्ही चॅनेलच्या हेडलाइन्समध्ये दोनच पक्ष चर्चेत असतात. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर दुसरा राज ठाकरेंचा मनसे. ज्यांच्याकडे एकही आमदार नाही खासदार नाही तरीही टीव्हीवर फक्त राज ठाकरे झळकतात. सरकारच्या विरोधात प्रचंड प्रमाणात बोलल्यामुळे त्यांना ईडीची नोटीस आली. तसेच पक्षाची पडझड झाली तरी हेडलाइन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे पक्ष असतात, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

Protected Content