बामणोद व विरोदा येथे ई-पॉस मशीन नादुरुस्त ; पावतीवर रेशन देण्याची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बामणोद व विरोदा येथील ई-पॉस मशिनच्या सावळ्या गोंधळामुळे रेशन वाटपात व्यत्यय येत असल्याने याचा गोरगरिबांना फटका बसत आहे. ई-पॉस मशिन व्यवस्थितपणे काम करत नसल्याने पूर्वी प्रमाणे पावतीवर रेशन देण्यात यावे अशी मागणी ग्राहक करीत आहेत.

 

तालुक्यात विविध ठिकाणी रेशन दुकानातील ई-पॉस मशीन सर्व्हर डाऊनमुळे स्वस्त धान्य दुकानादारांना धान्याचे वाटप करता येत नाल्याचा प्रकार घडत आहे.  स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशिन काम न करणे, अर्धा तास सुरु तर दोन तास बंद असते. यामुळे स्वस्त धान्य दुकानात धान्य वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरीकांकडुन करण्यात येत आहे. यासंदर्भात बामणोद स्वस्त धान्य दुकानदार सुभाष तायडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,  आम्ही जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार जिल्हाधिकारी कार्यालयात १७  ऑगस्ट रोजी यासंदर्भात निवेदन दिले.त्यांनी NIC ला कळवू असे सांगितले. एन आय सी मध्ये मशीनचा प्रॉब्लेम आहे. आम्ही मशीनचा फोटो घेऊन, गर्दीचा फोटो घेऊन वरिष्ठांना कळवत असतो. आम्ही धान्य देण्यासाठीच आहे. मात्र सर्व्हरमुळे आम्ही देऊ शकत नाही. ही हतबलता त्यांनी व्यक्त केली. परंतु, ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर धान्य मिळत नाही गर्दी होते. वृद्ध धान्य घ्यायला लाईन मधे येतात त्यामुळे त्यांना सामना गर्दीचा व सर्व्हरचा करावा लागतो.

 

सर्व्हर चालत नसल्यास पावतीवर धान्य मिळण्याची मागणी

ग्रामीण भागात सर्व्हरच्या अडचणी  येत असल्यास यापूर्वी शासन जसे पावती देऊन धान्य देत होते, त्याच प्रमाणे शासनाने पावतीवर धान्य  देऊन वेळेचा सदुपयोग करावा व ग्राहकांची कुचंबणा  थांबवावी अशी मागणी येथील ग्राहकांकडून होत आहे.

 

विरोदा स्वस्त धान्य दुकानदार बोर्ड फलक नाही

बामनोद येथून जवळच असलेल्या विरोदा येथील स्वस्त धान्य दुकानावर फलक नाही. किती धान्य आले, नागरिकांची संख्या कुटुंबाची संख्या किती असा कोणताही फलक आढळला नाही. एकाच्या घरात स्वस्त धान्य दुकानाचा माल भरलेला होता. धान्यसाठी नागरिक एक -दोन तासापासून रांगेत होते  मात्र इ-पोज मशीन काम करत नसल्याने नागरिक बऱ्याच वेळेपासुन तात्कळत उभे होते.

Protected Content