बनावट कागदपत्रे बनवून मालमत्ता हडपण्याच्या कटातील पाच संशयित आरोपींना अटक

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बनावट कागदपत्रे बनवून महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याच्या कटातील पाच संशयित आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात घेतले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रम, श्री कृष्ण मंदिर, जामनेर तालुक्यातील मौजे शहापूर महानुभाव आश्रम व भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील महानुभाव आश्रम व इतर स्थावर मालमत्ता ही रविराज मुकुंदराज येळमकर यांच्या मालकीची असल्यावर ही भातखंडे येथील साधका शिष्य मोहन येळमकर यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृत्यूपत्र बनवून स्वताच्या नावे करुन घेतल्याबद्दल रविराज मुकुंदराज येळमकर यांनी फिर्याद दिल्यावरुन पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृत्यूपत्र बनवून मौजे आंबेवडगाव शिवार शेत गट नं. ९८ व ९४/२ वरील पारीमांडल्य महानुभाव आश्रम व मंदार, मौज शहापुर शिवार रात गट नं. ५४८/१ वरील महानुभाव आश्रम तसेच मौज भातखंडे बु” शिवार रातील गट नं. ६४ वरील महानुभाव आश्रम या मुकुंदराज येळमकर यांच्या मिळकती प्रॉपर्टी आरोपी मोहन येळमकर यांनी स्वत:च्या नावावर करणेसाठी दि. २० नोव्हेंबर २०२० रोजीचे ११ वाजेपासून ते ०२ जुलै २०२२ रोजीचे १० वाजेचे दरम्यान तलाठी, आंबेवडगांव यांचेकडे सादर करून फिर्यादीची फसवणूक केल्याचा कट उघडकीस आला आहे.

याबाबत अंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रमाचे महंत रविराज मुकुंदराज यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून मोहन येळमकर रा. भातखंडे ता. भडगाव, विजय माधवराव बांधकर रा. मनसर, ता. रामटेक, जि. नागपूर, संतोष शेनफडु बडगुजर रा. वरसाडे, ता. पाचोरा, विनोद जयकृष्ण दर्यापूरकर रा. करनवाडी ता. मारेगांव, जि. यवतमाळ व नितीन पंडित कुलकर्णी रा. भवानी नगर, गिरडरोड, पाचोरा पाच संशयित आरोपींना पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.”

हा गुन्हा नोंद झाल्यापासून अंबे वडगाव गावातील व पंचक्रोशीतील जनतेतून समाधान व्यक्त केले जात असून हा गुन्हा दाखल झाल्यापासून काही स्वयंघोषित प्रतिष्ठित या कटकारस्थानात सहभागी असलेले परंतु पडद्यामागून भूमिका पार पाडणारांच्या पायाखालची वाळू सरकली असून हे कित्येक राजकीय व काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या दरवाज्यावर खेट्या घालून हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. परंतु पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता सखोल चौकशी भक्तांच्या श्रध्दास्थानाच्या मुख्य महतांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृत्यूपत्र बनवण्यासाठी मदत करणारे जरी मुख्य नायक सापडले असले तरी यांची भुमिका साकारण्यासाठी पडद्यामागचे सुचक व अजूनही काही स्थानिक व काही बाहेरील गावचे लोक सहभागी असून पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीसांनी या गुन्ह्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी पंचक्रोशीतील भाविक, भक्त व सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

Protected Content