कुरंगी येथे सरपंचपदी सुरेश कोळी यांची बिनविरोध निवड

sanjay koli

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील कुरंगी येथील सरपंचपदी आज सुरेश कोळी (सर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासुन कोळी समाजाच्या पहिल्याच सरपंच पदी सुरेश कोळी यांची वर्णी लागली आहे. या सरपंच पदाचा मान माजी आ.दिलीप वाघ यांनी मिळवून दिल्याबाबत कोळी समाज बांधवानी दिलीप वाघ यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व ग्रा.प. सदस्याचे आभार कोळी समाजबांधवान कडुन मानण्यात येत आहे. निवडणुक प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी नांद्रा मंडळाधिकारी रमेश मोरे यांनी काम पाहिले. कुरंगीचे नवनिर्वाचीत तलाठी मयुर आगरकर, ग्रामसेवक परखाड माजी सरपंच गजानन पवार, दिपक मोरे, गुलाब पाटील, आमिन शेख, सुदाम पाटील, इंदुबाई सोनवणे, मंगला भोई, वंदणा पाटील, उषा पाटील, कमलबाई भिल्ल, मधुकर पाटील, विठ्ठल पाटील, पांडुरंग कोळी, विजय कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content