डीपीच्या शॉर्टसर्कीटमुळे मका जळून खाक; ८० हजाराचे नुकसान

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उंदीरखेडा शिवारात डीपीवरील शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत मका जळून खाक झाला असून ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा शिवारातील सुभाष हरी शिंपी (वय-५३) यांचे शेत आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. यंदी त्यांनी शेतात मका पिकाची पेरणी केली होती. दरम्यान त्यांच्या शेतात महावितरण कंपनीची डीपी बसविण्यात आली आहे. १७ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास डीपीवर झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे मका पिकाला अचानक आग लागली. या आगीत सुमारे ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यात आले. परंतू तोपर्यंत शेतकऱ्याचे मोठ नुकसान झाले होते. याप्रकरणी सुभाष शिंपी यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद साळी करीत आहे.

Protected Content