जिल्ह्यातील रेशन लाभार्थ्यांच्या पदरात निकृष्ट दर्जाचे धान्य

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये सद्यास्थितीत वाटप होत असलेल्या ज्वारीत लहान लहान किडे तसेच धान्य संपुर्ण निकृष्ट दर्जाचे वाटप होत असल्याने ते तात्काळ बंद करावे, अशा मागणीचे निवेदन श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठाणतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

त्या निवेदनानुसार सध्यस्थिती जळगाव शहरामध्ये सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून पुरवण्यात आलेलि धान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्यातील  ज्वारी हे धान्य अत्यंत निकृष्ट प्रतीचे असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात किडे (धनौर) लागलेले असून त्यातील  अर्धी जास्त ज्वारी  ही काळपट व पाणी लागलेली आहे. तसेच सदरील ज्वारीचा मोठय़ा प्रमाणावर उग्र स्वरुपाचा वास येत असतो. त्यामुळे सदरील ज्वारी ही खाण्याचे लायक नसूनसुद्धा ती सद्यस्थिती स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येत  आहे. सदरील निकृष्ट प्रतीचे धान्य वाटप करून शासन एक प्रकारे जनतेच्या जिवाशी खेळत आहेत. या बाबत संबधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे विचारपूस व तक्रार केली असता ते सांगता की यात आमचा काहीही दोष नसून आम्हास जिल्हा पुरवठा अधिका यांकडून तसे धान्य येते तसते ते आम्ही वाटप करीत असतो. त्यामुळे यात आम्ही काहीच बदल करू शकत नाही. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना याबाबत निवेदनकर्त्यांना तोंडी आश्वासन दिले की संबंधितांची मी आमचे  स्तरावरून चौकशी करून याबाबतचे धान्याचे सॅम्पल मागवितो व पुढील वाटपासाठी सदरील धान्य हे येत थांबविणेबाबतचे संबधितांना योग्य त्या सूचना करतो.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना त्यांच्या दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना वरील विषयाबाबत निवेदन सादर केले असून सुनिल सुर्यवंशी, जिल्हापुरवठा अधिकारी, जळगाव यांना सुद्धा टपालाव्दारे निवेदन सादर केले.

निवेदन देतेवेळी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान जळगाव अध्यक्ष दीपक दाभाडे, माहिती अधिकार कार्यकर्ते  दीपक कुमार गुप्ता, आईबाबा फाउंडेशन जळगाव अध्यक्ष शैलेश ठाकूर, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान जळगाव विभाग गजानन माळी,  सामाजिक कार्यकर्ते शेखर तडवी, पप्पू जगताप, मोहन पाटील, सोनू माळी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

Protected Content