गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे बेकादेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर एमआयडीसी पोलीसांनी रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता  छापा टाकून १ हजार २५० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना रविवारी ३० जानेवारी रोज दुपारी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोहेकॉ गफार तडवी, पोकॉ शांताराम पाटील, महिला पोलीस आलका माळी, पोकॉ. सिध्देश्वर लटपटे यांनी दुपारी १ वाजता कुसुंबा येथे छापा टाकला. यात दारू विक्री करणारी महिला आशा विकास सोनवणे वय-३२ वर्षे, रा.सुरेशदादानगर कुसुंबा ता.जि. जळगाव या महिलेकडून १ हजला २५० रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोकॉ. सिंध्देश्वर लटपटे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content