Home Cities जळगाव रोटरी वेस्टतर्फे वर्धापनदिनी रक्तदान शिबीर (व्हिडिओ)

रोटरी वेस्टतर्फे वर्धापनदिनी रक्तदान शिबीर (व्हिडिओ)

0
35

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या २८  व्या वर्धापन दिनानिमित्त रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने सोमवार दि.२६  एप्रिल रोजी  मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे सर्वांसाठी खुले रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

कोरोनाच्या गेल्या वर्षभराच्या काळात रोटरी वेस्टने रोटरी परिवार जळगाव, रेडक्रॉस, रोटरॉक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि सायकलींग असोसिएशन जळगाव या संस्थांच्या सहकार्याने या पूर्वी तीन रक्तदान शिबिर आयोजीत केले होते. २८  व्या चार्टर डे अर्थात वर्धापन दिनानिमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता रक्तदान शिबिर आयोजित केले  असल्याचे माजी अध्यक्ष अनंत भोळे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले.   याप्रसंगी अध्यक्ष  तुषार चित्ते, सचिव केतन पटेल, कृष्णा वाणी, अमृत मित्तल आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2822282668019959

 


Protected Content

Play sound