भाजपा महीला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी मालती पाटील

यावल प्रतिनिधी I नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी भाजपाच्या महिला तालुका उपाध्यक्षपदी तालुक्यातील टाकरखेडा येथील मालती पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

यावल येथे नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक उत्साहात संपन्न झाली. सदर बैठकीत भाजपाच्या महिला तालुका उपाध्यक्ष पदी यावल तालुक्यातील टाकरखेडा गावच्या मालतीताई खापरू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपूत यांच्या सुचनेनुसार हि निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल व्यंकट चौधरी ,सभापती यावल पंचायत समिती पल्लवीताई चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, सरपंच परिषद जिल्हा जळगाव अध्यक्ष पुरुजित चौधरी ,जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील, पंचायत समिती भाजपा गटनेता दीपक पाटील, नगरसेवक कुंदन फेंगडे, निलेश गडे, शहर अध्यक्ष भाजपा, व्यकटेश चौधरी, मीना चौधरी, कांचन फालक, अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. तत्पूर्वी मालती खापरू पाटील या टाकरखेडा गावाच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य असून माजी पोलीस पाटील खापरू पाटील यांच्या पत्नी व सैनिक विनोद पाटील व मनोज पाटील यांच्या आई आहे. त्या भाजपाच्या एकनिष्ठ पदाधिकारी असून तीस वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल तालुका भरातुन त्यांचे कौतुक होत आहे.

Protected Content