उपमहापौर पाटील व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात शाब्दिक वाद (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | कोविड काळानंतर प्रथमच ऑफ लाईन झालेल्या महापालिकेच्या महासभेस भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यातील शाब्दिक वादाने सुरुवात झाली. परंतु, इतर सदस्यांच्या यशस्वी मध्यस्थीने वाद मिटविण्यात आल्याने सभा सुरळीत सुरु झाली.

 

सभागृहात महापौर जयश्री महाजन व आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या अभिभाषणानंतर महापौर यांनी नगरसचिवांना सभागृहाचे पुढील कामकाज सुरु करण्याच्या सूचना दिल्यात. अचानक त्याच वेळी भाजपचे जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आपल्या स्थानावर उभे राहत उपमहापौर यांना व्यासपीठावर बसण्याचा अधिकार आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत उपमहापौर यांचे अधिकार काय काय आहेत त्याची माहिती हवी असल्याचे जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगताच सभागृहात गोंधळाचे वातावरण तयार झाले. अधिकाऱ्यांना नगररचना विभागाच्या प्रत्येक फाईल माझ्याकडून गेल्या पाहिजे हे सांगण्याचा अधिकार आहे का ? तोडीपाणीसाठी उपमहापौर बनले आहेत का ?  असा प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी या आरोपांना उत्तर देत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी एकेरी उल्लेख करू नका ? असे कैलास सोनवणे यांना सांगितले. याला दाद न देता कैलास सोनवणे यांनी मी एकेरी उल्लेख करेन असे स्पष्ट केल्याने गोंधळात भर पडली. यावेळी भाजपचे सभागृह नेते ललित कोल्हे व इतर सदस्यांनी श्री. सोनवणे यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा श्री. सोनवणे यांनी घेतला. कैलास सोनवणे यांनी महापौरांना सांगितले की, शांतेत बैठक व्हावी असे वाटत असेल तर नियमाने कामकाज करावे लागेल. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कैलास सोनवणे यांनी त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध करावे असे आवाहन दिले. तर नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना बोलविण्याचा अधिकार उपम्हापौराना नसल्याचे मत कैलास सोनवणे यांनी मांडले असता उपमहापौरांनी ते अधिकाऱ्यांना बोलविण्याचा अधिकार कसा नाही असा प्रश्न उपस्थित केला.  कैलास सोनवणे यांचे नाव घरकुल घोटाळ्यात आले असल्याने त्यांनी नैतिकता दाखवून सभागृहाच्या कामकाजात भाग घेवू नये असे आवाहन उपमहापौरांनी केले. याला प्रती उत्तर देत या घोटाळ्याचा प्रमुख कोण आहे ? असा प्रश्न उपस्थित करत त्या प्रमुखाचे नाव जाहीर करण्याचे आव्हान देत प्रथम त्यांना शिवसेनेतून काढा अशी मागणी कैलास सोनवणे यांनी केली. यावेळी ते सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांचे नाव सभागृहात घेऊ नका असे शिवसेनेचे जेष्ठ नेते विष्णू भंगाळे यांनी कैलास सोनवणे यांना समजविण्याचा प्रयत्न केला. याबाबत कैलास सोनवणे यांनी आठवण सांगितले की, तनुजा तडवी ह्या महापौर असताना रमेश जैन हे उपमहापौर होते. त्यावेळेस नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी हाच प्रश्न उपस्थित केला असता रमेश जैन यांनी व्यासपीठ सोडले होते याचर्चेला उत्तर देतांना महापौर जयश्री महाजन यांनी भाजपच्या भारती सोनवणे ह्या महापौर असताना देखील उपमहापौर व्यासपीठावर बसत होते. महापालिकेत उपमहापौर हे व्यासपीठावर बसण्याची प्रथा पूर्वी पासून चालत असल्याने त्याच धर्तीवर आज उपमहापौर कुलभूषण हे व्यासपीठावर बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/324711539655504

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/899109494129165

Protected Content