मध्यप्रदेशात येणार आमचे सरकार : कॉंग्रेसचा दावा

भोपाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कथित अंतर्गत सर्व्हेच्या आधाराने मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार येणार असल्याचा दावा या पक्षातर्फे करण्यात आला आहे.

 

अलीकडेच कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दणदणीत विजय झाला असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. यानंतर वर्षाच्या अखेरीस मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका होत आहे. यातील मध्यप्रदेशात सध्या शिवराजसिंह चौहान यांचे सरकार असून येथे कॉंग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

 

दरम्यान, कॉंग्रेसने ट्विट करत मध्यप्रदेशातील आगामी निवडणुकीत आपण विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी अनेक सर्व्हे समोर आले आहेत. यात मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत  भाजपाला   केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. कॉंग्रेसकडे २०१८ च्या १५ महिन्यांचा कार्यकाळाचा अनुभव आणि कमलनाथ यांच्यासारखा निर्विवाद व अनुभवी नेता आहे. हे मुद्दे घेऊन कॉंग्रेस जनतेसमोर जात असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Protected Content