भविष्य निर्वाह निधीचे व्याज दर जाहीर

 

मुंबई : वृत्तसंस्था । केंद्र सरकारने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी सामान्य भविष्य निर्वाह निधीचे व्याज दर जाहीर केले आहेत.

 

या तिमाहीच्या व्याज दरामध्येही बदल झालेला नाही. केंद्र सरकारकडून लवकरच व्याजाची रक्कमही कोट्यावधी खातेदारांच्या खात्यावर पाठवली जाऊ शकते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतही सामान्य भविष्य निर्वाह निधीवर 7.1 टक्के दराने व्याज मिळणार आहे. कमी व्याजदराच्या या युगात जीपीएफ व्याजदरामध्ये कोणतीही कपात न करणे, ही कोट्यवधी खातेदारांसाठी चांगली बातमी मानली जात आहे.

 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि भविष्य निर्वाह निधीसारख्या सुविधा सामान्य भविष्य निर्वाह निधीवर उपलब्ध आहेत. सलग सहाव्या तिमाहीत केंद्र सरकारने जीपीएफच्या व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर चालू तिमाहीच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जूनच्या तिमाहीतही जीपीएफचा व्याज दर फक्त 7.1 टक्के आहे. हे व्याजदर एप्रिल 2020 मध्ये अखेरचे बदलण्यात आले होते. त्या काळात केंद्र सरकारने जीपीएफचे व्याज दर 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांवर आणला होता.

 

जनरल प्रोव्हिडेंट फंड हा एक भविष्य निर्वाह निधी आहे. पण त्याची सुविधा केवळ विशिष्ट प्रकारच्या कर्मचार्‍यांना दिली जाते. जनरल प्रॉव्हिडंट फंडाचा फायदा फक्त सरकारी कर्मचार्‍यांना मिळतो. सेवानिवृत्तीच्या वेळी ही सुविधा उपलब्ध आहे. जीपीएफचा फायदा घेण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांना पगाराचा काही भाग जनरल प्रॉव्हिडंट फंडामध्ये ठेवावा लागेल. सामान्य भविष्य निर्वाह निधीत काही सरकारी कर्मचाऱ्यांना बचत करणे बंधनकारक आहे.

 

सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 15 टक्के हिस्सा सामान्य भविष्य निर्वाह निधीला देऊ शकतात. सामान्य भविष्य निर्वाह निधी खात्यातील सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे ‘अ‍ॅडव्हान्स’. या वैशिष्ट्यानुसार कर्मचारी आवश्यक असल्यास त्यांच्या जीपीएफ खात्यातून निश्चित रक्कम काढू शकतो. तसेच त्यानंतर ती जमा देखील करू शकतात. त्यांना यावर कोणताही कर भरावा लागत नाही. जीपीएफवरील व्याज दर तिमाही आधारावर सुधारित केले जातात.

 

Protected Content