बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारेला अटक

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी जितेंद्र कंडारे याला आज अटक करण्यात आली असून यामुळे या प्रकरणातील तपासाला गती येण्याची शक्यता आहे.

बीएचआरवर अवसायक म्हणून नेमण्यात आलेल्या जितेंद्र कंडारे याने इतरांना हाताशी धरून या सोसायटीत कोट्यवधीचा घोटाळा केला आहे. या प्रकरणात सुनील झंवर यांच्यासह जितेंद्र कंडारे हा प्रमुख आरोपी होती. आजवर त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या होत्या. मात्र आज सायंकाळी त्याला इंदोर येथून अटक करण्यात आली आहे.

सुनील झंवर हा मध्यंतरी जळगावात येऊन गेल्याची चर्चा होती. तर झंवर हा मध्यप्रदेशातील इंदूर परिसरात वेश बदलून राहत असल्याची चर्चा देखील होती. या पार्श्‍वभूमिवर जितेंद्र कंडारे हा इंदूर येथेच आढळून आल्याची बाब ही अतिशय लक्षणीय मानली जात आहे.

जितेंद्र कंडारे हाच बीएचआर सहकारी पतसंस्थेतील दुसर्‍या टप्प्यातील घोटाळ्याचा प्रमुख आरोपी होता. त्याच्या माध्यमातूनच पावत्या मॅचींगसह अन्य गैरप्रकार घडले. यात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांना कवडीमोल भावात विकण्याचा गोरखधंदादेखील करण्यात आल्याचे उघड झाले होते.

Protected Content