…आणि जगाला दिसला आमदारातील प्रेमळ पिता !

भडगाव संजय पवार । माणूस पदाने कितीही मोठा असला तरी मायेच्या बंधनात तो किती हळवा होतो याची प्रचिती आज आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दाखवून दिली. जनसेवेच्या रगाड्यात आपल्या मुलीची राहून गेलेली भेट ही जमावासमोर घेतांना आमदारकीची झुल उतरून एक मायाळू बाप म्हणून भावनाशील स्वभावाचे आप्पा आज लोकांनी पाहिले…!

आमदार आपल्या गावी हा उपक्रमांतर्गत कार्यक्रम व्यस्ततेमुळे आमदार किशोर पाटील घरी जावुन कन्या डा. प्रिंयका पाटील यांना भेटु शकले नाही. कार्यक्रम स्थळी बापलेकीची झालेल्या अनोख्या भेट प्रसंग तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
भडगाव तालुक्यात आमदार किशोर पाटील यांच्या वतीने आमदार आपल्या गावी हा उपक्रम सुरु आहे. उपक्रमांतर्गत आमदार पाटील नियोजनानुसार गावभेट घेऊन सकाळपासुन दिवसभर या कार्यक्रमांच्या माध्यमातुन नागरीकांच्या समस्या, विकास कामे, ग्रामस्थाचे गार्‍हाणे ऐकुन घेत आहे. दि. २६ रोजी रात्री आमदार कन्या डा. प्रिंयका पाटील या लग्नानंतर प्रथमच माहेरी आल्या होत्या. नातेवाईकाच्या भेटी नंतर दि.२७ रोजी डॉ. प्रियंका पाटील सासरी जाण्यासाठी निघाल्या. जाण्याआगोदर पित्याची भेट घेण्यासाठी आमदारांना फोनवर फोन लावत घरी वाट पाहत होती. मात्र आमदार किशोर पाटील हे आमदार आपल्या गावी या उपक्रमांतर्गत तांदुळवाडी येथील आयोजीत कार्यक्रमात व्यस्त होते.

दरम्यान, सासरला जातांना डॉ. प्रियंका ही कजगाव चाळीसगाव रस्त्यावर तांदुळवाडी फाटयाजवळ भेटण्यासाठी फोनवर संपर्क साधत वाट पाहत होती. मात्र जनतेला न्याय देण्यासाठी सुरु असलेला कार्यक्रम आ. किशोर पाटील यांना जाता आले नाही. मात्र पितृ प्रेमाने भारावलेल्या कन्या डॉ. प्रियंका हयांनी अखेर तांदुळवाडीचा कार्यक्रम गाठत आ. किशोर पाटील यांची भेट सर्वाना आश्‍चर्यचकीत केले. आणि आपल्या कन्येला अचानक समोर पाहून आप्पा भारावले. त्यांनी तिची गळाभेट घेतली. याप्रसगी डॉ. प्रियंका पाटील यांचे समस्त ग्रामस्थाच्यावतीने शाल पुष्पहार सत्कार करण्यात आला. हा सत्कार म्हणजे डा प्रिंयका पाटील यांना सासरी जाण्यासाठी जणुकाही निरोपच होता.

पिता व मुलीची गळा भेट पाहुन उपस्थित सारे नागरीक, महिलाही भावनाविवश झाले होते. मुलीला आशिर्वाद देत किशोर पाटील यांनी मुलगी सासरी रवाना केले. या प्रंसगी आमदारांच्या डोळयात आनंदाश्रु तरारल्याचे दिसुन आले.

Protected Content