भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू तस्करांविरोधात पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुना वाक रस्त्यावरील विट भट्टीजवळ विनापरवाना अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पोलिसांनी रंगेहात पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भडगाव शहरातील विटभट्टीजवळून अवैधरित्या वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्यासची माहिती भडगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी १८ मे रोजी पहाटे ४ वाजता कारवाई करत विनाक्रमांकाचे ट्रक्टर पकडले. चालकाची कसून चौकशी केली असता चालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी संजय पाटील हे करीत आहे.




