खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत वाढ

मुंबई प्रतिनिधी | भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना आज पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबबात वृत्त असे की, भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ५ जुलै रोजी अटक करण्यात आली असून खडसेंची चौकशी करण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले आहे. दरम्यान ईडीच्या कोठडीस असलेल्या गिरीश चौधरी यांना आणखी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना १९ जुलैपर्यंत ईडी कोठडीत रहावे लागणार आहे.

गिरीश चौधरी यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी आज कोर्टात केला. तर या प्रकरणात आम्हाला अनेक साक्षीदार सापडत आहेत. काही साक्षीदार पुढील आठवड्यात ईडीच्या कार्यलयात येणार आहेत. त्यामुळे साक्षीदार आणि आरोपी यांचा आम्हाला समोरासमोर तपास करायचा आहे. त्यामुळे ७ दिवसांची ईडी कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी कोर्टात केला. त्यानंतर कोर्टाने १९ जुलैपर्यंत म्हणजे ४ दिवसांची ईडी कोठडी दिली.

Protected Content